Breaking News
अहमदाबाद विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन
अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया AI-171 ड्रीमलाइनर विमानाच्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सर्व २४२ प्रवासी आणि क्रू सदस्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात पंजाब भाजपचे प्रभारी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले. ते ३ वर्षे पंजाब भाजपचे प्रभारी होते. ३ दिवसांपूर्वी लुधियाना येथील पश्चिम मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. यापूर्वी, ३ जून रोजी पक्षाचे उमेदवार जीवन गुप्ता यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. ते ९ जून रोजी लुधियानाहून गुजरातला रवाना झाले होते. भाजप नेते त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी आले होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर