Breaking News
अंगणवाडी सेविकांनी केले आझाद मैदानात आंदोलन
मुंबई - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज भरूनही प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही.शासन निर्णय ३ जुलै २०२४ नुसार, लाभार्थ्यांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेनंतर पात्र लाभार्थ्यांप्रमाणे अंगणवाडी सेविकांना प्रत्येक लाभार्थ्यांच्या हिशेबाने ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, राज्यातील अनेक सेविकांना फॉर्म भरूनही अद्याप भत्ता मिळालेला नाही. विशेष म्हणजे, सेविकांच्या अनुपस्थितीत अनेक अंगणवाडी मदतनीसांनीही लाभार्थ्यांचे फॉर्म स्वतःच्या मोबाईलमधून भरले
होते. शासनाच्या पोषण ट्रॅकरमध्ये त्यांचा क्रमांक नोंदवलेला असूनही केवळ स्पष्ट आदेश नसल्यामुळे या मदतनीसांना भत्ता नाकारण्यात आला.
अल्प मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी सिम रिचार्जचा खर्चही स्वतः केला होता, तरीही त्याचा आर्थिक मोबदला अद्याप मिळालेला नाही. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मॅच्युरिटी रक्कम मिळावी, कामासाठी लागणाऱ्या मोबाईल रिचार्जसाठी निधी द्यावा, केंद्रासाठीचे साहित्य उपलब्ध करून द्यावे तसेच गरोदर व स्तनदा मातांना टीएचआर वाटप करताना सक्तीचे फेस रेकॉग्निशन रद्द करावे, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची माहिती अंगणवाडी सेविकांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade