Breaking News
राज्यातील 53 ITI ना मिळणार नव संजीवनी
मुंबई - राज्यातील ५३ ITI ना नवसंजीवनी मिळणार आहे. यासाठी पाच वर्षांच्या कालावधीत ‘दक्ष’ आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाला १,३२५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या प्रयत्नांना जागतिक बँकेनेही हातभार लावला असून, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंटच्या (दक्ष) द्वारे हा उपक्रम कार्यन्वित होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख ITIचा यात समावेश आहे. ३६ जिल्ह्यांतील या ३६ आयटीआयसोबतच मुलींसाठी असलेल्या १५ आयटीआयचाही त्यात समावेश आहे. तसेच, आदिवासी क्षेत्रातील दोन आयटीआयचा विकासही या उपक्रमांतर्गत होणार आहे.
जागतिक बँकेने या ५३ आयटीआयचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले. या आयटीआयकडून आम्ही विकासाचा आराखडा मागवून घेतला आहे. या विकास आराखड्यात आयटीआयनी त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, दुरुस्तीची कामे, नवीन ट्रेड सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री आदींची माहिती नमूद केली आहे. जागतिक बँकेने केलेल्या सर्वेक्षणासोबत ही माहिती पडताळून पुढील पाच वर्षांत प्रत्येक आयटीआयला त्यांच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाईल, अशी माहिती संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade