Breaking News
तैवान ओपनच्या पहिल्या दिवशी भारताने जिंकली ४ सुवर्णपदके
देश विदेश
ऑलिंपियन ज्योती याराजीने या हंगामात महिलांच्या १०० मीटर अडथळ्यांमध्ये विजय मिळवत आपली दमदार कामगिरी सुरू ठेवली. आज चायनीज तैपेई येथे झालेल्या तैवान अॅथलेटिक्स ओपन २०२५ च्या पहिल्या दिवशी भारताने सहा सुवर्णपदके जिंकली.
पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांमध्ये राष्ट्रीय विक्रम धारक तेजस शिरसेनेही १३.५२ सेकंदांच्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह आपल्या आवडत्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
भारताने पुरुष आणि महिलांच्या १०० मीटर रिलेमध्येही सुवर्णपदके जिंकली.
सुधीक्षा वडलुरी, अभिनया राजाराजन, स्नेहा एसएस आणि नित्या गंधे या पथकाने महिलांची १०० मीटर रिले जिंकली.
पुरुषांच्या १०० मीटर रिलेमध्ये गुरिंदरवीर सिंग, अनिमेश कुजूर, मणिकांत होबलीधर आणि अमलन बोरगोहेन या पथकाने सुवर्णपदक जिंकले.
तत्पूर्वी, पूजाने महिलांच्या १५०० मीटर शर्यतीत वर्चस्व गाजवत भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.
अब्दुल्ला अबूबकरने पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताचे दुसरे सुवर्णपदक मिळवले, तिसऱ्या प्रयत्नात १६.२१ मीटरची उडी मारली.
दोन दिवसीय तैवान अॅथलेटिक्स ओपन २०२५ उद्या संपेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant