Breaking News
शरण आलेल्या १३ नक्षली युवक- युवतींचा पोलिसांच्या उपस्थितीत लग्नसोहळा
गडचिरोली - येथे आज एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. आत्मसमर्पण केलेल्या 13 नक्षल युवक-युवतींचा लग्नसोहळा मोठ्या उत्साहात आणि पोलिसांच्या साक्षीने संपन्न झाला. विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस मुख्यालयात गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न झाला. गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
वर्षानुवर्षे घनदाट जंगलात बंदुकीच्या जोरावर क्रांती घडवू पाहणाऱ्या अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट धरली आहे. पोलीस मुख्यालयातील शहीद पांडू अलाम सभागृहात हा विवाह सोहळा संपन्न होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह गणमान्य नागरिक उपस्थित होते. नव विवाहित नक्षल दांपत्यांना मुख्यमंत्री स्वतः शुभ आशीर्वाद देणार असून विविध साहित्याचे वाटपही करण्यात आले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर