Breaking News
मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार, या कलाकारांना जीवनगौरव
मुंबई -‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे 2025 चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ हे पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार वितरण कार्यक्रम
१४ जून रोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.दिनांक १४ जून २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता यशवंत नाट्य मंदिर,माटुंगा इथं हा सोहळा पार पडणार आहे.हा सोहळा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्रीआशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उद्योगमंत्री , अ.भा.मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
व्यावसायिक नाट्य पुरस्कार
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade