Breaking News
RCB च्या विजय जल्लोषात चेंगराचेंगरी, 11 जणांचा मृत्यू
बंगळुरू - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या IPL २०२५ विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान चेंगराचेंगरी झाली असून, यात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 33 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना चिन्नास्वामी स्टेडियमजवळ घडली, जिथे हजारो चाहत्यांनी RCB च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी गर्दी केली होती. RCB ने IPL २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचा पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा सार्वजनिक सोहळा आयोजित करण्यात आला होता, परंतु चिन्नास्वामी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. गेटवर अचानक झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, आणि अनेक जण खाली पडले, ज्यामुळे काहींना गंभीर दुखापत झाली.
पोलीस आणि प्रशासनाची प्रतिक्रिया
पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, आणि जखमींना बोवरींग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अतिरिक्त रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या, परंतु रस्त्यावरील गर्दीमुळे रुग्णवाहिकांना वेगाने हालचाल करता आली नाही. कर्नाटक सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव विजय मिरवणुकीला आधीच स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियमबाहेर गर्दी केली.
RCB संघाची प्रतिक्रिया
RCB संघाने या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला, आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदतीचे आश्वासन दिले. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाने चाहत्यांना सुरक्षिततेचे पालन करण्याचे आवाहन केले
आरसीबीला विजयी परेड रद्द
बंगळुरुतील चेंगराचेंगरीनंतर पोलिसांनी आरसीबीला विजयी परेड रद्द करण्याची विनंती केली होती. त्यामुळे आरसीबीने विक्टरी परेड रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. एखादी मोठी ट्रॉफी जिंकल्यावर विजयी परेड काढली जाते. विजयी संघासाठी ही मानाची गोष्ट असते. पण आता जी बंगळुरुमध्ये जी चेंगराचेंगरी झाली त्यामुळे आता विजयी परेड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आरसीबीने जरी १८ वर्षांनी विजय साकारला असला तरी त्यांना आता विक्टरी परेड काढता येणार नाही.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आरसीबी संघ विधानसभेत पोहोचला तेव्हा विधानसभेबाहेर एक लाख लोक जमले होते. विधानसभेत जल्लोष सुरू होता, पण चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली. स्टेडियमबाहेर ३ लाख लोक जमले होते. आम्हाला एवढी मोठी गर्दी अपेक्षित नव्हती. कोणीही हे अपेक्षित केले नव्हते.”
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर