Breaking News
चिनाब नदी पुलावरून आज प्रथमच धावली ‘वंदे भारत’
जम्मू-काश्मीर - आज ‘वंदे भारत’ एक्सप्रेसने प्रथमच चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून यशस्वी प्रवास केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक क्षणाला हिरवा झेंडा दाखवला, आणि कटरा-श्रीनगर मार्गावर वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. भारतीय रेल्वेची ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी मानली जात आहे. चिनाब नदीवरील हा पुल ३५९ मीटर उंच आहे, जो एफिल टॉवरपेक्षा ३५ मीटर अधिक उंच आहे. १,३१५ मीटर लांबीचा हा स्टील आर्च ब्रिज भूकंप आणि हवामानाच्या सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा भारतातील पहिला केबल-आधारित रेल्वे पुल आहे, जो जम्मू आणि श्रीनगर दरम्यान दळणवळण सुधारण्यास मदत करेल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade