NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

डॉ. हेगडे चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धेत ६ जूनपासून शालेय ३२ खेळाडूंमध्ये चुरस

मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ३२ खेळाडूमध्ये माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक विनाशुल्क कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ६ जूनपासून चुरस होईल. डॉ. अँटोनियो दासिल्व्हा हायस्कूलचा राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू ध्रुव भालेराव विरुध्द जीके वरळी मुंबई पब्लिक स्कूलचा नैतिक लादे यामधील उद्घाटनीय लढत माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कॅरमप्रेमी मंगेश चिंदरकर व राजन राणे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी परेल येथील आरएमएमएस सभागृहात शुक्रवारी सकाळी १०.३० वा. सुरु होईल.  


     अजिंक्यपद पटकाविण्यासाठी महात्मा गांधी विद्यामंदिरची राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवी, न्यू इंग्लिश स्कूल-जैतापूरचा आर्यन राऊत, पोद्दार अकॅडमी-मालाडचे प्रसन्न व पुष्कर गोळे, शिर्के हायस्कूल-रत्नागिरीची स्वरा मोहिरे, आयईएस सुळे गुरुजी शाळेची ग्रीष्मा धामणकर, पार्ले टिळक विद्यालयाचे सार्थक केरकर व मंदार पालकर, चेंबूर हायस्कूलचा मयुरेश पवार, आयएनजी स्कूल-वसईचा श्रीशान पालवणकर, ओमकार इंटरनॅशनलचे प्रेक्षा जैन, कनोसिया हायस्कूलची वेदिका पोमेंडकर, मायकल हायस्कूलचा निखील भोसले, जनरल एज्युकेशन अकॅडमीचे वेदांत लोखंडे, आयईएस पाटकर विद्यालय-डोंबिवलीचे नील म्हात्रे, देविका जोशी व निधी सावंत आदी सबज्युनियर कॅरमपटूमध्ये निकराच्या लढती ७ जूनपर्यंत रंगतील. पंचाचे कामकाज सचिन शिंदे, संतोष जाधव, ओमकार चव्हाण, अर्जुन कालेकर आदी पाहणार आहेत.


******************************

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट