Breaking News
किड्स समर कॅम्प 2025जल्लोषात आणि नवनवीत संकल्पना घेऊन परिपूर्ण झाला..
हे शिबीर अभ्युदय कलादालनात मा.नगरसेवक दत्ता पोंगडे यांच्या सौजन्याने यशस्वीपणे पार पडले....
या शिबिरात मार्शल आर्ट एक्सपर्ट ऋषिकेश दळवी,कॅम्प संचालिका यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात हरहुन्नरी कला शिक्षक मनोहर पेडणेकर,संगीत दिग्दर्शक नंदू परब,त्यांची शिष्या श्रेया इंगळे यांनी सोप्या भाषेत संगीत शिकवले तबल्यावर सराव घेतला, मराठी विज्ञान परिषदेचे माजी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि विज्ञान विषयाला वाहून घेतलेले अभय यावलकर यांनी सोप्या भाषेत विज्ञानातील रहस्य सप्रमाण उलगडून प्रयोग करत प्रत्येकाला प्रयोग करून विश्वास दिला.
या उपक्रमात दानशूर समाजसेवक डॉ.जगन्नाथ हेगडे, डॉ प्रगजी वाजा, मा.नगरसेवक दत्ता पोंगडे,उमेश येवले,समाजसेवक महेंद्र सातपुते,युवा उद्योजक उदय पवार यांनी सदिच्छा भेट देऊन रुची दाखवली.प्रतीक नांदगावकर,सागर निवगुडे यांनी दिलेला पाठींबा,तसेच काळाचौकीची आयडॉल बालगायिका वेदश्री आणि विनायक जाधव यांनी गाणी म्हणून घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली.
अभिनंदन...
पूजा मॅडम, ऋषिकेश दळवी सर..
आपल्या मेहनत चिकाटी आणि कलेविषयी असलेल्या पॅशनमुळे हे विविधांगी शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant