Breaking News
चित्पावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य
नाशिक :– महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. चित्पावन ब्राह्मण संघास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. गुरूदक्षिणा सभागृहात आयोजित चित्पावन ब्राह्मण संघ नाशिक यांच्या श्री परशुराम भवन या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, माजी मंत्री डॉ. भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष विजय साने, उपाध्यक्ष अविनाश भिडे, विश्वस्त देवेंद्र बापट, प्रा. दिलीप फडके आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, चित्पावन ब्राह्मण संघाने अतिशय सुंदर वास्तू उभारलेली आहे. त्यांनी सुरू केलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. चित्पावन समाजातील अनेकांनी संघर्षातून पुढे येत स्वकर्तृत्वाने नावलौकिक मिळविला आहे. तसेच संघाने समाजात दुधात साखर विरघळते त्या प्रमाणे कार्य करावे. सर्व ज्ञातींनी एक होऊन कार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. साने यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी चित्पावन ब्राह्मण संघाची माहिती दिली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते देणगीदारांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला चित्पावन ब्राह्मण संघाचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade