NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

जागतिक बौद्धिक संपदा दिन: बुद्धी, कल्पकता आणि सर्जनशीलतेचा सन्मान

मुंबई - संपदा, म्हणजेच संपत्ती.. जी आपल्याला स्थावर, जंगम मालमत्ता म्हणजे पैसे, सोनं नाणं, घर वगैरे अशी दृश्य स्वरूपात असलेली संपत्ती चटकन् लक्षात येते. मात्र बौद्धिक संपदा म्हणजे नक्की काय भानगड? हे अनेकांना माहितीच नसतं. निसर्गानं मानवाला काही विशेष बुद्धी वरदान म्हणून दिली आहे. आणि त्या बुद्धीच्याच जोरावर माणसाने इतर प्राण्यांच्या तुलनेत मोठी प्रगती केली.

संपूर्ण पृथ्वीवरच्या आयुष्यात उलथापालथ घडवली, इतकं करून थांबला नाही, तर त्या पलिकडे अवकाशातही झेपावला. माणसाच्या ह्या प्रगतीमागे कोण आहे? तर माणसाला मिळालेला मेंदू. ज्यातून, माणसानं ही स्वतःची सृष्टी निर्माण केली. आज आपल्याला दिसणारे जग, त्याआधी कधीतरी माणसाच्या डोक्यात जन्मलेले आहे, तिथे कल्पनेच्या रूपात असलेल्या ह्या जगाला माणसानेच मग मूर्त रूप दिले. पण ह्या दोन्ही गोष्टी करण्यासाठी, माणसाने जो बुद्धीचा वापर केला, ती म्हणजे त्याची बौद्धिक संपदा.

जर बौध्दिक संपदा नसेल, तर बाह्य, दृश्य स्वरूपातही संपदा निर्माणच होऊ शकणार नाही. हे झालं बौध्दिक संपदेचे महत्त्व. आता ही संपदा तर आपल्या मेंदूतच असते, मग तिचे संरक्षण करण्याची गरज काय? ती कशी कोणी हिरावून नेणार? तर ज्या सुपीक डोक्यातून नवनवीन कल्पना येतात, त्यातून उभ्या राहणाऱ्या वस्तू / वास्तू तर चोरीला, हिसकावल्या जाऊ शकतात. मात्र बौध्दिक संपदा नेता येत नाही. मग ज्या विशेष माणसांच्या कल्पनेतून हे सगळं अद्भुत जन्मलं, निर्माण झालं, त्यांना त्यांचं श्रेय सर्वार्थाने मिळायलाच हवं ना?हीच आहे बौद्धिक संपदा.. आणि त्याबद्दल जागृती, त्याचं संरक्षण करण्यासाठी हा दिवस !

यंदाच्या म्हणजे जागतिक बौध्दिक संपदा दिनाची संकल्पना आहे.. ” बौद्धिक संपदा आणि संगीत : बौद्धिक संपदेचा नाद समजून घ्या ” म्हणजेच, संगीता कलावंत,संगीतकार, गायक, गीतकार, अशा सर्वांच्या original कलाकृतींचे, संगीताचे संरक्षण करण्यासाठी आयपी अधिकार कायदा कसा उपयुक्त ठरतो, यावर ह्यात भर देण्यात आला आहे.

कला, मग ती संगीत असो किंवा चित्रकला, शिल्पकला किंवा इतर काहीही सृजन. ही त्या प्रतिभावंतांची समाजाला देणगी असते, आनंद देणारी असते. मात्र कलाकार मनस्वी असतो, अनेक दिवसांच्या विचारानंतर, मेहनतीनंतर त्याची कला सृजित होत असते. या कलेचा सन्मान होणं, त्याचा यथोचित मोबदला त्याला मिळणं आवश्यक असते आणि न्याय ही.

आजकाल पायरसी चे जग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तर कलेचीही बेमालूम कॉपी करते आहे. अशावेळी, या कलाकारांच्या कलेचं संरक्षण होण्यासाठी सर्वांनीच अधिक सजग राहण्याची गरज आहे. कलेच्या चोरीचे विपरीत परिणाम लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. त्याच दृष्टीने यंदा, भारतात आयपी उत्सव 2025 हा साप्ताहिक उत्सव साजरा करण्यात आला होता. देशभरात झालेल्या विविध कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बौध्दिक संपदा म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना यावेळी सांगितल्या. बौद्धिक संपदेचे पेटंट म्हणजे काय? ट्रेडमार्क, कॉपीराइट काय असतो? तो कसा मिळवता येतो, हे ही समजावून सांगितलं. जेणेकरून कलावंतांना, उदयोन्मुख कलाकारांना आपल्या मूळ संगीतकला आणि इतर कलाकृतींचे संरक्षण करता येईल.

संशोधनं आपले आयुष्य अधिक सुखकर करण्यास मदत करतात, तर कला, साहित्य आपलं जगणं अधिक समृद्ध करतात. जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ह्या संपदेचा सन्मान सर्वांनीच राखावा, ती चोरून किंवा ओरबाडून घेऊ नये, तिची भ्रष्ट आवृत्ती तयार करू नये, इतकी समज, आणि संवेदना माणसात आली, तरीही हा दिवस साजरा करणे सफल झाले असं म्हणता येईल.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट