NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

महिलादिन विशेष : स्त्रियांच्या स्वाथ्याबद्दल बोलू काही....

महिलादिन विशेष : स्त्रियांच्या स्वाथ्याबद्दल बोलू काही.... 

नमस्कार मैत्रिणींनो जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला म्हटलं की अनेक जबाबदारी असलेली स्त्री समोर येते अनेक दुःख पचवू न ही हसत सर्वांना आनंदाने वागणूक देत असताना दिसते.

आज खास तुमच्यापुढे महिला दिनानिमित्त मी एक श्रृंखला घेऊन येते आपला हा सर्वांचा आवडता वृत्तपत्र आदर्श स्वराज्य ज्याच्यामध्ये आपण हा लेख वाचणार आहात. महिलां संबंधित असणार आहे. महिलांच्या इच्छा त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा त्यांचा शारीरिक आणि मानसिक आरोग्य बद्दलचा विचार न करता फक्त तिच्याकडे अपेक्षाच करत राहणं हे योग्य नाही. प्रत्येक महिलाही समाजाच्या आणि आपल्या अवतीभवतीच्या प्रत्येकाची मन धरणी करण्यात आणि त्यांना प्रेम देण्यात त्यांची सेवा करण्यात वेळ घालवते आणि जेव्हा आपले हातपाय थकतात आणि आपण फक्त त्यावेळी लक्षात येतात स्वतःसाठी तर जगायचं राहूनच गेलं. चला तर मग मी अपर्णा नेमकं या शृंखलेच्या निमित्ताने आपल्या महिलांच्या स्वास्थ्य  बद्दल बोलणार आहे.

यामध्ये आपल्या मनामध्ये असलेल्या प्रत्येक विचारांचा आपल्या शरीरावर कोणत्या प्रकारे परिणाम होत असतो आणि त्या परिणामाना आपण कसं सामोरे जायचं. आपल्या विचारांमध्ये जर सकारात्मकता असेल तर नक्कीच आपलं स्वास्थ्य सुदृढ आणि आनंदी आनंद जीवनात असतो सगळ्या गोष्टी छान होत असतात. परंतु ज्या क्षणी आपल्या विचारांमध्ये किंवा आपल्या बद्दल इतरांच्या वागणुकीमुळे नकारात्मकता आली किंवा इतर काही गोष्टी घडल्या की ज्याच्याने आपल्याला त्रास होईल त्याचा आपल्या मनावर आणि शरीरावर कोणता परिणाम होतो या सगळ्याचा विवेचन मी येथे करणार आहे आणि त्यासाठी सोपे काय उपाय आहेत जे आपले आपण करू शकतो तेही मी इथे उलगडणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डॉक्टर कडे जातो आणि अनेक प्रकारच्या आपण  तपासण्या करतो.

ज्याच्यामध्ये आपल्याला थायरॉईड हा खूप सगळ्यात सर्वत्र दिसणारा आजार आहे थायरॉइड मध्ये दोन प्रकार आहेत ज्याच्यामध्ये एका प्रकारामध्ये वजन वाढतच राहतं आणि दुसऱ्या प्रकारांमध्ये वजन कमी होत राहतं. पण याचा कारण मात्र आम्हाला माहिती नाही आम्ही आपले सरळ डॉक्टरांनी सांगितलेला गोळ्या सरळ चालू करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अनेक प्रकारे पचनाचे आजार होतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारे हार्मोन्सचे आजार होतात किंवा हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे असमानतेमुळे अनेक प्रकारे अनेक त्रासांना सामोरे जावे लागते पण या सगळ्यांना इग्नोर करून किंवा यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण फक्त कामात स्वतःला गाडून घेतो ते योग्य आहे का तर सगळ्यात महत्त्वाचा एक लक्षात घ्या मैत्रिणींनो की आपल्या प्रत्येक विचारांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो त्यामुळे आपण जर दुःखी असो तर आपलं शरीरही त्याचे सगळ्यात प्रकारे सिग्नल्स द्यायला लागतात किंवा अनेक अनेक प्रकारे आपल्याला शरीराच्या तखरणारी जाणवायला लागतात सगळ्यात हा त्रास जाणवतो आणि त्याचप्रमाणे आपल्या भारतीय नारींमध्ये जर म्हणाल तर एक अतिशय त्रास देणाऱ्या विषय म्हणजे हिमोग्लोबिनची कमतरता आपल्या शरीरामध्ये सर्वच महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळते हा मी नव्हे तर डब्ल्यूएचओ दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने केलेला सर्वे सांगतो आपलं हेल्थ आपली तब्येत ही एवढी स्वस्त आहे का की आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करू आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण परत पहिल्यासारखे हो तर नाही त्यामुळे आपले छोट्या-मोठ्या शारीरिक तक्रारी ह्या आपल्याला कुठल्या ना कुठल्याद्वारे मानसिक त्रासाबद्दलही सुचवत असते सगळ्यात सामान्यपणे आढळणारा अजून एक त्रास म्हणजे ऍसिडिटी पित्त पित्त खूप प्रकारे आपल्याला जाणीव होत असते पोटात जळजळ होणे छातीत जळजळ होणे ढेकर येणे शरीरावर आपल्या त्वचेवर सुद्धा अनेक प्रकारे चट्टे उठतात राशेस म्हणतात त्याला शिवाय खाज येणे सोरायसिस होणे केस गळणे अनेक अनेक प्रकारे आपल्याला त्रास होत असतो फक्त गोळ्या खाऊन त्याच्यावर उपाय होऊ शकतो का ह्याचा समूळ नाश केला पाहिजे म्हणूनच म्हणतात ना शरीराप्रमाणेच जर आपण मनाच्या स्वास्थ्याबद्दल मनाच्या आरोग्याबद्दल विचार केला तर आपलं लाईफ आपलं आयुष्य हे खूप सुखकर होईल निरोगी होईल निरामय होईल आणि त्याचप्रमाणे आपल्याला आनंदी आनंद अनुभवता येईल चला तर मैत्रिणींनो आज या महत्त्वाच्या दिवशी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्तता देण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या टिप्स देणार आहेत.

१. सर्वप्रथम स्वतःला वेळ द्या.

२. स्वतःच्या पोषणाची जबाबदारी घ्या आपल्याला शरीराला आणि मनाला सुद्धा एका विशिष्ट आहाराची गरज असते तो आहार आपण व्यवस्थित घेतला पाहिजे आहार झाल्यानंतर विहार . 

३. रोजच्याच जीवनामध्ये आपल्याला थोडा का होईना व्यायाम केला पाहिजे मग तो कोणत्याही प्रकारचा असू दे साधं चालणं असे नका केला पाहिजे थोडेसे व्यायाम योगाचे प्रकार असतात जे आपण आपल्या पद्धतीने आपल्या घरी करू शकतो ते केलं पाहिजे.

४. त्याचप्रमाणे आपल्याला शांत आरामात झोप झाली पाहिजे. 

जर या गोष्टी नियमितपणे जर आपण करू लागलो तर मी नक्कीच सांगते की आपल्या सुदृढ जीवनाकडे वाटचाल करत आहोत.

 या पुढील लेखांमध्ये मी प्रत्येक विशिष्ट अशा त्रासावरती बोलणार आहे. जसं नैराश्य म्हणजे ज्याला आपण इंग्लिश मध्ये डिप्रेशन म्हणतो दुसरं आहे भीती ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो त्याचप्रमाणे, चिडचिड का होते झोप का लागत नाही डोळे का जळजळतात डोकं खा दुखतंय मला मायग्रेनचा त्रास का होतोय आणि इतर अनेक स्त्रियांच्या त्रासाबद्दल मी प्रत्येक लेखात बोलणार आहे चला तर भेटूया पुढच्या शृंखलेमध्ये जिथे आपण निराशा बद्दल बोलणार आहोत त्याचे कारण आणि त्याच्यावरील उपाय हे मी तिथे नमूद करणार आहे धन्यवाद

अपर्णा निमकर 

मानसोपचार तज्ञ आणि समुपदेशक 

९१५२३०११३७


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट