Breaking News
परिस्थिती अनुकूल असल्यास जरांगे निवडणुकीच्या मैदानात
जालना - आम्हाला समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांची भावना आहे उमेदवार उभा केला पाहिजे, मात्र एका जातीवर उमेदवार उभा करणं आहे निवडून आणणं हे सोपं नाही. मराठा जातीत पडायची ताकद आहे त्यामुळे आपण मधला मार्ग काढला , परिस्थिती अनुकूल असल्यास निवडणुकीच्या मैदानात उताण्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीर केले आहे.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळेस आमचं म्हणणं आहे की आपण निवडून आणून दाखवावं. मी समाजाचा चौफेर विचार केला, जिथे उमेदवार निवडून येतील तिथे उमेदवार उभे करायचे. एस.सी. आणि एस. टी च्या ज्या जागा आहे, त्या ठिकाणी जो उमेदवार लिहून देईल की आम्ही मराठ्यांच्या मागण्यांशी सहमत आहे, त्याला निवडून आणणार असे जरांगे म्हणाले.
जिथे उमेदवार उभे करायचे नाही तिथे समोरच्या (महायुती/ महाविकास आघाडीच्या) उमेदवाराने 500 रुपयांच्या बाँड वर लिहून द्यायचं की आम्ही मराठ्यांच्या मागण्यांशी सहमत आहे. सगळ्या उमेदवारांनी आता फॉर्म भरा, नंतर ज्याला सांगितलं जाईल त्याने त्याचा फॉर्म काढून घ्यायचा आहे. किती मतदार संघात उमेदवार द्यायचे या बाबतचा निर्णय 3/4 दिवसात सांगणार आहोत असे ते म्हणाले.
जिथे आपण उमेदवार देणार तिथे आम्ही एस.सी, एस. टी, मुस्लिम ज्या समाजाचा उमेदवार येईल त्याचा आम्ही विचार करून त्या ठिकाणी तो उमेदवार दिला जाईल. मला लांबून सगळंच दिवसत नाही.
या मतदार संघात आपलं सीट निघत हे मला समाज बांधवांनी येऊन सांगा तिथे आपण आपला उमेदवार देऊ. मुंबईत मराठ्यांचे मोठं मतदान आहे, तिथे आपण 17 जागा पाडू शकतो. मी लिस्ट काढणार आहे, कुठे आपण उमेदवार उभे करू शकतो आणि कुठे उमेदवार उभे करता येत नाही.
मतदान बूथ कोणाला capture करू द्यायचं नाही. ओबीसी आणि मराठा हा वाद फक्त दिसतोय तसं काहीही नाही. गावोगावी मुस्लिम, दलीत, ओबीसी एकच आहेत असेही जरांगे यावेळी म्हणाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर