जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई अध्यक्षपदी उदय पवार

जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई अध्यक्षपदी उदय पवार


मुंबई  : जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई विभागाच्या अध्यक्षपदी उदय अशोक पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. युनियनचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. नारायण पांचाळ तसेच राजेंद्र साळसकर यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्रातील पत्रकारांच्या हितासाठी निर्माण झालेली ट्रेड युनियन असून ही इंडियन जर्नालिस्ट युनियनला संलग्न आहे. पत्रकार समाजाच्या हित साधले जाणारे लिखाण करत असतो. विविध प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे आवाज उठवत असतो. शासन, राज्यकर्ते, सरकारी अधिकारी-कर्मचारी यांच्या कृतीवर लक्ष ठेऊन सरकारी कामातली पारदर्शकता नागरिकांपर्यंत पोहोचवत असतो. प्रसंगी संबंधितांना जाब विचारण्याचे धैर्य दाखवतो. यासाठी पत्रकारांना संविधानाने हक्क, जबाबदार्‍या, संरक्षण आणि नियम दिले आहेत.  कामगार कायद्यानुसार २००४ मध्ये जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र ही संघटना स्थापन झाली असून, ही संघटना राष्ट्रीय पत्रकार संघटना इंडिअन जर्नालिस्ट युनियन (आयजेयु), नवी दिल्ली या संघटनेबरोबर संलग्न आहे, या संघटनेमार्फत वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या तसेच इतर वेब मिडियामध्ये काम करणार्‍या पत्रकारांना आणु इतर कर्मचार्‍यांना सरकारकडून सुविधा, मेडिक्लेम, सरकारी ओळखपत्र, घरे, पेन्शन मिळावी. पत्रकारांवर होणार्‍या हल्ल्यापासून संरक्षण मिळावे. इत्यादींसाठी ही युनियन कार्य करत आहे. मिडियामध्ये काम करणार्‍या पत्रकार, छायाचित्रकार कॅमेरामन, लेखक, डिटीपी ऑपरेटर आणि प्रुफ रीडर इत्यादि या युनियनचे सभासद होऊ शकतात. पत्रकारांचे सर्व प्रश्न खर्‍या अर्थाने या युनियनच्या माध्यमातूनच सोडवले जाऊ शकतात. म्हणून सर्व सहकारी पत्रकारांनी एकजुटीसाठी एकत्र होऊन व युनियनचे सभासद होऊन आपला सहयोग द्यावा असे जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी आवाहन केले आहे. उदय पवार यांनीही महाराष्ट्र अध्यक्ष नारायण पांचाळ आणि संघटनेतील सर्व सहकार्‍यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे सुतोवाच केले आहेत.


युवा उद्योजक म्हणून ख्याती असलेले उदय अशोक पवार एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माले आले. पण आज आपल्या कठोर परिश्रमामुळे स्वराज्य फाऊंडेशन, आर्यन फिल लॉन्ड्री सर्विस,स्टुडंट्स अकॅडेमी क्रेडिट सोसायटी, आदर्श स्वराज्य वृत्तपत्र तसेच टिंग टाँग ऑनलाईन ॲप या अनोख्या संकल्पनेतून हजारो नवउद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या उदय अशोक पवार यांना २०२३चा उद्योग रत्न पुरस्कार देऊन जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र यांनी सन्मानित केले आहे.

रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट