Breaking News
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) तर्फे मान्यवरांना पुस्तक भेट देण्याचा उपक्रम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) तर्फे सुरु असलेल्या जनसंपर्क अभियानाला मुंबई विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकनेते मा. शरदचंद्र पवार साहेब यांच्या कार्यावर आधारित राजकीय आत्मचरित्र “लोक माझे सांगाती” हे पुस्तक विभागातील मान्यवरांना भेट देण्यात येत आहे.
या उपक्रमाचा उद्देश पवार साहेबांच्या सात दशकांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, विचार आणि समाजकारणाची तळमळ जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांमार्फत घराघरात, संस्थांमध्ये आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांपर्यंत हे पुस्तक पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून अभ्युदय नगर सुयोग सहकारी गृहनिर्माण संस्थेचे माजी सचिव तसेच परेल सोशल सर्विस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सचिव श्री. राजेंद्र बाबुराव सकपाळ यांना भेट देऊन “लोक माझे सांगाती” हे पुस्तक भेट देण्यात आले. भेटीच्या प्रसंगी इस्रारखान, राजेंद्र कोचरेकर तसेच सकपाळ कुटुंबीय उपस्थित होते. या वेळी शरद पवार साहेबांच्या राजकीय प्रवासाबाबत आणि त्यांच्या नेतृत्वाखालील विविध सामाजिक उपक्रमांवर चर्चा झाली.
या उपक्रमाचे नेतृत्व उमेश येवले, सरचिटणीस – मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांनी केले. त्यांनी सांगितले की, “लोक माझे सांगाती हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मचरित्र नसून, ते एका जननेत्याचा आणि जनतेचा परस्पर संवाद आहे. या माध्यमातून आम्ही पवार साहेबांचे विचार, कार्य आणि संघर्षाची गाथा समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहोत.”
या अभियानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, नागरिकांमध्येही पवार साहेबांविषयी आदर आणि आत्मीयता अधिक वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant