Breaking News
SBI चे गृहकर्ज महागले
मुंबई - देशातील सर्वात मोठी बँक SBI ने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. SBI ने नवीन ग्राहकांसाठी गृहकर्जाचे दर ०.२५ टक्क्याने वाढवले आहेत. बँकेने व्याजदराची कमाल मर्यादा ८.४५ वरून ८.७० केली आहे. आता बँकेचे गृहकर्जावरील व्याज ७.५० टक्क्यांवरून ८.७० टक्के झाले आहे. व्याजदरातील हा बदल विशेषतः त्या ग्राहकांना प्रभावित करेल ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे.
कर्ज घेणाऱ्याच्या क्रेडिट प्रोफाइलवर अंतिम व्याजदर अवलंबून असतो. तुम्ही २० वर्षांसाठी ८.७०% व्याजदराने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले तर तुमचा मासिक ईएमआय सुमारे ४४,०२६ रुपये असेल. २० वर्षांत, तुम्हाला एकूण ५५.६६ लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. व्याजदर ८.४५% असता तर ईएमआय ४३,२३३ रुपये झाला असता. त्याच वेळी ५३.७५ लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागले असते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे