Breaking News
मुंबईतील एनटीसी चाळींचे लवकरच म्हाडाद्वारे पुनर्वसन होणार!
मुंबई - गेल्या तीन पिढ्यांच्या धोकादाय एनटीसी गिरण्यांच्या चाळींमध्ये राहण्राया कामगार रहिवाशांचे, राष्ट्रीय मिल मजूर संघाने उठविलेल्या संघर्षमयी आवाजामुळे आणि त्याला कृती समितीने दिलेल्या तितक्याच साथीमुळे अखेर दिवस पालटले आहेत!
मुंबईतील एनटीसी 11 चाळीच्या पुनर्वसना बाबत,मुंबई विकास नियमावली 2034 प्रस्थावित फेरबदला विषयी उक्त अधिनियम कलम 37,पोटकलम (1कक)चे खंड (क ) नुसार कोणत्याही व्यक्ती कडून सूचना मागविण्यात आल्या आहेत.
लवकरच म्हाडाद्वारे या इमारतींचा पुनर्विकास होणार आहे.त्यानुसार रहिवासी कामगारांना 405 चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे निवास मिळणार आहे.त्यासाठी गृहनिर्माण सरकारी अधिका-यांनी संबंधित रहिवाशांकडे येत्या 18 ऑगस्ट पर्यंत सूचना व हरकती मागविल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकतीच "मजदूर मंझील" येथे रा.मि.म.संघ आणि एनटीसी चाळ रहिवाशी कृती समितीची बैठक पार पडली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर त्यावेळी एनटीसी चाळ रहिवाश्यांशी बोलताना म्हणाले,एटीसी गिरणी कामगारांनी पुनर्वसनाची संधी सोडताकामा नये. संघटना भाडेकरुंना कदापि एकाकी पडू देणार नाही,असे सांगून सचिनभाऊ आहिर म्हणाले,मी देखील रहिवाशांच्या हितासाठी या प्रश्नावर लेखी सूचना व हरकती मांडणार आहे.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीच ही बैठक बोलावली होती. कृती समितीचे अध्यक्ष निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष भाऊसाहेब आंग्रे, सचिव किरण गावडे यांनी रहिवासी कामगारांच्या समस्या मांडल्या.समितीमध्ये कायम एकोपा ठेवण्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.या प्रसंगी नरेंद्र तारी, अभिनंदन मोरे, रविंद्र नाईक,सुरेश जिकमडे,दिपक कदम,श्री दिलेश जोशी, दीपक राणे,राजू सरमळकर,संजय कांबळे आदींनी चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडले.संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनीही आपल्या सूचना मांडल्या.या चाळीचे ताबडतोबीने पुनर्वसन झाले पाहिजे,अशी मागणी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी केली आहे.सभेत झिरो मेंटेनन्स,कॉर्परस फंड आणि ट्रझिस्टकॅम्प, पार्किंग झोन बाबत रहिवाशांनी आपल्या लेखी सूचना आणि हरकती मांडण्याचे ठरविले आहे.या प्रश्नवर अता पर्यंत दोन बैठका झाल्या असून, दुस्रया बैठकीत रहिवाशांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर