Breaking News
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन
मुंबई – कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे नाव देण्यात आलेल्या मेट्रो स्थानकाविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), दक्षिण मुंबई विभाग क्र. १२ चे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांचे नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी या स्थानकावर “कोटक” या नावावर स्टिकर लावून, “छत्रपती शिवाजी महाराज सन्मान” असे नाव देण्याची मागणी केली.
शिवसैनिकांचा ठाम आग्रह आहे की, कोटक नाव हटवून, फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव सन्मानाने ठेवण्यात यावे, कारण महाराजांचे नाव कोणत्याही व्यावसायिक ब्रँडसोबत जोडणे हे अपमानास्पद आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा मेट्रो प्रशिक्षण केलेला अपमानच आहे. येत्या आठवड्याभरात हे जर नाव हटवलं नाही तर आम्ही मेट्रो प्रशासनावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू असा इशारा शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी दिला. यावेळी महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, राजू फोडकर, महिला विधानसभा प्रमुख गायत्री आवळेगावकर, तसेच शिवसेनेचे विविध विभाग महिला आघाडी, युवा सेना, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar