Breaking News
तेंडोली तांबाडगेवाडीतील ग्रामस्थांचा गावाशी संपर्क तुटलेलाच….
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग प्रशासनाने दिलेल्या ऑरेंज अलर्ट नुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्यातील तेंडोली गावातून वाहणाऱ्या उज्ज्वला नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तेंडोली तांबाडगेवाडी कॉजवेवर प्रचंड प्रमाणात पाणी आले आहे. यामुळे येतील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला आहे.
तेंडोली तांबाडगेवाडी येथील कॉजवे १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. मात्र, या कॉजवेची उंची त्यावेळी कमी ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात वारंवार त्यावरून पाणी वाहते. यामुळे येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो. या नदीची पूरस्थिती चार ते पाच दिवस तशीच कायम राहात असल्याने येथील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटतो. या वाडीतून रुग्णांना उपचारासाठी आणता येत नाही. तसेच अन्य कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी या वाडीतील ग्रामस्थांचा गावाशी असलेला संपर्क पूर्णतः तुटलेला असतो, त्यामुळे या कॉजवेची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांनी अनेकदा केली आहे. मात्र यावर कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून अद्याप पावेतो झालेली नाही.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे