Breaking News
चीनच्या ‘गोल्ड गेम’मुळे जगाला चिंता
बिजींग - आर्थिक महासत्तेकडे वेगाने वाटचाल करु लागलेला चीन अनपेक्षित निर्णयांनी नेहमीच जगाला हादरे देत असतो. जून 2025 मध्ये चीनमध्ये सोन्याच्या खरेदीचा दर थोडा मंदावला असला तरी, पहिल्या सहा महिन्यांत सोन्याच्या गुंतवणुकीने विक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालात इतरही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यामुळे चीनच्या नवीन ‘गोल्ड गेम’ची खेळाची बाब समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे की आतापर्यंतचा सर्वाधिक खरेदी गोल्ड ईटीएफमध्ये दिसून आली. तर महागड्या सोन्यामुळे लोक दागिने खरेदी करण्यापासून दूर जात असल्याचे दिसून आले. 2025 च्या पहिल्या सहामाहीत, चिनी गोल्ड ईटीएफमध्ये 64,000 कोटी रुपये (US$ 8.8 अब्ज) गुंतवण्यात आले. ही आतापर्यंतची ऐतिहासिक गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले आहे. चीनने मे 2025 मध्ये 89 टन सोने आयात केले. एप्रिलपेक्षा 21 टक्के आणि गेल्या वर्षीच्या मेपेक्षा 31 टक्के कमी आहे. दागिन्यांची मागणी कमी असणे हे याचे मुख्य कारण होते.
चीनच्या मध्यवर्ती बँकेने सलग आठव्या महिन्यात सोने खरेदी केले आणि पहिल्या सहामाहीत एकूण 19 टन सोन्याचा साठा वाढवला. चीनमध्ये आता 2299 टन सोने आहे. जूनमध्ये सोन्याचे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मंदावले होते. परंतु पहिल्या सहामाहीत सरासरी 534 टन प्रतिदिन व्यवहार झाले. ही आतापर्यंतचे सर्वाधिक अर्धवार्षिक मूल्य असल्याचे सांगण्यात येते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant