Breaking News
अनंत अंबानी करणार लालबागच्या राजाच्या मंडप सजावटीचा खर्च
मुंबई : मुंबईतील परळमधील प्रसिध्द लालबाग राजाच्या गणेश मंडपाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. यंदाही रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी मंडपाच्या संपूर्ण सजावटीचा खर्च देणार आहेत. ते गेल्या वर्षीपासून मंडळाचे कार्यकारी सल्लागार आहेत.
यंदाच्या गणेशोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ १४ जून रोजी पार पडलेल्या गणेश मुहूर्त पूजनने करण्यात आला. या मंडळाचा यंदा ९२ वा उत्सव आहे. अंबानी कुटुंबियांचा लालबाग राजा मंडळासोबत गेली दोन वर्षे संबंध आहे. त्यांना मंडळाचे आमंत्रित विशेष सदस्य आहेत. दरवर्षी ते गिरगाव चौपाटीपर्यंत लालबाग राजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. २०२४ मध्ये अनंत अंबानी यांनी गणरायाला २० किलोचे सोन्याचे मुकुट अर्पण केला होता. यंदा ५० फूट उंच मंडप उभारण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी वातानुकूलित यंत्रणा, आतील आणि बाह्य सजावट आणि भंडाऱ्याचा संपूर्ण खर्च अनंत अंबानी करीत आहेत.
२०२४ मध्ये लालबागच्या राजाला ५ कोटी ६५ लाख रुपयांचे दान मिळाले होते . ४.१५ किलो सोने आणि ६४.३२ किलो चांदीही अर्पण करण्यात आली होती. २०२३ मध्ये पाच कोटी रुपयांची रोख रक्कम आणि अंदाजे ८० लाख रुपयांचे सोने व चांदी दान केले होते. २००८ मध्ये सर्वाधिक म्हणजे ११.५ कोटी रुपयांचे दान मिळाले होते. उत्सवानंतर दान झालेल्या सोने चांदीच्या वस्तूंचा लिलाव केला जातो आणि त्यात मिळालेल्या निधीतून स्वस्त दरातील डायलेसिस केंद्र, वाचनालय, अध्ययन कक्ष, रोजगार केंद्र, योग प्रशिक्षण केंद्र आणि संगणक शिक्षण संस्था अशा सामाजिक उपक्रमांवर खर्च केला जातो.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर