Breaking News
आकाशवाणी आमदार निवासच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ FDAकडून सील
मुंबई : आकाशवाणी आमदार निवासातील मारहाण प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. दिवसभरातील नाट्यमय घडामोडींनंतर आता आमदार निवास कॅन्टिनमधील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला मारहाण केली होती. हा विषय विधिमंडळातही गाजला. मारहाणीच्या प्रकारानंतर कॅन्टीनमधील पदार्थांची एफडीएने तपासणी केली. त्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री कॅन्टिनमध्ये निकृष्ट जेवण मिळाल्याने शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. संजय गायकवाड यांचा मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर कॅन्टिनच्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्न तर उपस्थित झालाच पण गायकवाडांवर देखील टीकेची झोड उठली. त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे पथक दाखल कॅन्टिनमध्ये दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून आमदार निवासाच्या कॅन्टिनमधील स्टोअर रूमची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान खाद्यपदार्थ आणि तेलाच्या बाटल्यांचे सॅम्पल नमूने घेतले. हे सगळे नमून सील करण्यात आले. तपासणीसाठी पुढे फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. यातच स्टोअर रूमचं ऑडिटही झाल. या तपासणीचा अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे