Breaking News
मुंबईत आणखी दोन मेट्रो धावणार; मार्गिकांची सुरक्षा तपासणी सुरू, पाहा मार्ग अन् स्थानके
Mumbai Metro Lines 2B and 9 updates: मुंबई मेट्रो ही एक शाश्वत आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. मुंबई महानगर प्रदेशात ती एक भक्कम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठरताना दिसत आहे. दररोज लाखो नागरिक मेट्रोने सुखकर असा प्रवास करू लागले आहेत. नागरिकांचे आयुष्य आणखी सुखकर होऊ लागले आहे. संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे पसरले आहे. मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत आणखी दोन मेट्रो येणार आहेत. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या दोन मेट्रो, त्यांचा मार्ग काय आहे आणि स्थानके कोण-कोणती आहेत.
मुंबईतील दोन उन्नत मेट्रो मार्गिकांची सुरक्षा तपासणी सुरू करण्यात आली आहे. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून ही तपासणी सुरू आहे. या दोन मार्गिकांमध्ये चेंबूर-मंडाळे ही मेट्रो 2 बी आणि दहिसर-काशिमिरा मेट्रो 9 यांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर आता चाचणीसाठी आवश्यक असलेली गाडी मुंबईत दाखल झाली आहे. या गाडीची गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्तरांची चाचणी सुरू होती. आता सुरक्षा तपासणी सुरू आहे.
मेट्रो मार्गिका सुरू करण्याआधी सुरक्षा आयुक्तांचे प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे असते. सुरक्षा आयुक्त हे विविध तपासणीनंतर हे प्रमाणपत्र देतात. आता सुरक्षा तपासणी सुरू झाील आहे. ही सुरक्षा तपासणीत, गाडीचा वेग, सिग्नल यंत्रणा, स्थानकांवरील सुरक्षा, रुळांची क्षमता तसेच इतरही यंत्रणांचे निरीक्षण केले जाते. त्याचा अहवाल एमएमआरडीए देईल. त्यानंतर अंतिम प्रमाणपत्र दिले जाईल. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा होईल.
असा आहे मेट्रो मार्ग - 2ब (डी. एन. नगर - मंडाळे)
मार्गाची लांबी - 23.643 कि.मी. (उन्नत)
मार्गाचा रंग - पिवळा
एकूण स्थानके - 20 (उन्नत)
(1. एसिक नगर, 2, प्रेम नगर, 3. इंदिरा नगर, 4. नानावटी हॉस्पिटल, 5. खीरा नगर, 6. सारस्वत नगर, 7. नॅशनल कॉलेज, 8. बांद्रा मेट्रो, 9. इन्कम टॅक्स ऑफिस, 10. आय एल एफ एस, 11. एम टी एन एल मेट्रो, 12. एस जि बर्वे मार्ग, 13. कुर्ला (पूर्व), 14. इ. इ. एच., 15. चेंबूर, 16. डायमंड गार्डन, 17. शिवाजी चौक, 18. बी एस एन एल मेट्रो, 19. मानखुर्द, 20. मंडाळे मेट्रो.)
मेट्रो स्थानके जोडणी
डी एन नगर (मेट्रो मार्ग -1)
बांद्रा (उपनगर)
आय टी ओ जं. (मेट्रो मार्ग -3)
कुर्ला पूर्व (उपनगर) (मेट्रो मार्ग -4)
चेंबूर (मोनोरेल)
मानखुर्द (उपनगर) (छशिमट-पनवेल फास्ट कॉरिडॉर)
मुंबई ते नवी मुंबई फास्ट कॉरिडॉर
असा आहे मेट्रो मार्ग - 9 (दहिसर - काशीमिरा)
लांबी - 13.581 किमी
दहिसर (पू) ते मीरा-भाईंदर)
1. दहिसर, 2. पांडुरंग वाडी, 3. मिरागाव, 4. काशीगाव, 5. साई बाबा नगर, 6. मेदितिया नगर, 7. शहीद भगतसिंग गार्डन, 8. सुभाषचंद्र बोस स्टेडियम
मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर