Breaking News
म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात
मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाण्यात आपल्या हक्काचं घर घेण्याचं तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. कारण, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सध्या 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेच्या अंतर्गत घरांची विक्री सुरू आहे. पण आता नव्याने घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.
2000 घरांसाठी लॉटरी
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 2000 घरांच्या लॉटरीसाठी जाहिरात काढण्यात येणार आहे. या लॉटरीसाठी म्हाडाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता ठाणे परिसरात आपल्या हक्काचं घर खरेदी करण्याचं सर्वसामान्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे.
नेमकी कधी निघणार जाहिरात?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या 2000 घरांच्या लॉटरीची जाहिरात ऑगस्ट महिन्यात काढण्याचे नियोजन आहे. त्याची प्रक्रिया म्हाडाकडून सुरू करण्यात आली आहे. कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितले की, 20 टक्के सर्वसमावेश गृहयोजनेतील काही घरे उपलब्ध झाली आहेत. पंतप्रधान आवास योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेतील काही घरे पूर्ण झाली आहेत. मनपा निवडणुकांपूर्वी सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे. निवडणुकांनंतर प्रत्यक्ष सोडत काढण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, ज्यात अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असेल.
ही घरे नेमकी कोणत्या परिसरात?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून काढण्यात येणाऱ्या या लॉटरीतील घरे ठाण्यात असणार आहेत. त्यासोबतच कल्याण, शीळ, विरार, कल्याण परिसरातील घरांचा सुद्धा या लॉटरीत समावेश असण्याची शक्यता आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर