Breaking News
ट्रेन सुटण्याच्या 8 तास आधी तिकिट होणार कन्फर्म
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीनंतर गाड्यांचे आरक्षण चार्ट ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केले जातील, असा निर्णय घेतला आहेत. आतापर्यंत हा चार्ट फक्त ४ तास आधी तयार केला जात होता. या नवीन नियमामुळे प्रवाशांना पर्यायी प्रवास निवडण्यासाठी किंवा तिकीट कन्फर्म न झाल्यास दुसरे तिकीट बुक करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. रेल्वे बोर्ड लवकरच हे बदल टप्प्याटप्प्याने लागू करेल.
हा नियम प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहे. पण सुरुवातीला तो हमसफर श्रेणीतील गाड्यांसारख्या निवडक गाड्यांमध्ये लागू केला जाईल. नंतर तो राजधानी, शताब्दी, मेल, एक्सप्रेस आणि सुपरफास्ट सारख्या इतर गाड्यांमध्येही लागू केला जाईल. दुपारी २ वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट आदल्या दिवशी रात्री ९ वाजता तयार केला जाईल. उदाहरणार्थ, जर ट्रेन सकाळी ८ वाजता असेल तर त्याचा चार्ट रात्री ९ वाजता तयार केला जाईल. यामुळे सकाळच्या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही पुरेसा वेळ मिळेल.
दरम्यान यापूर्वी, भारतीय रेल्वेने १ मे पासून वेटिंग तिकिटांसाठी नवीन नियम लागू केले होते. त्यानुसार, वेटिंग लिस्ट तिकिटे असलेल्या प्रवाशांना आता स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी राहणार नाही.ज्या प्रवाशांची तिकिटे वेटिंग लिस्टमध्ये आहेत त्यांना आता फक्त जनरल कोचमध्येच प्रवास करता येईल. जर एखादा प्रवासी वेटिंग तिकिटावर एसी किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना आढळला तर त्याला दंड आकारला जाईल.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant