Breaking News
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
पुणेकरांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. पुणे मेट्रोच्या विस्तारासाठी केंद्र सरकारकडून 3600 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.
हा दुसरा टप्पा सध्याच्या पहिल्या टप्प्यातील (वनराज-रामवाडी) मेट्रो मार्गाचाच विस्तार असणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात दोन उन्नत (एलिव्हेटेड) कॉरिडॉर असतील. यातली कॉरिडॉर 2A अंतर्गत वनाज ते चांदणी चौक पर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाईल. तर कॉरिडॉर 2B अंतर्गत रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे.
हे दोन्ही कॉरिडॉर मिळून 12.75 किलोमीटर लांबीचे असतील आणि त्यात 13 स्थानके असतील. या विस्तारांमुळे पुणे शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच वेगाने विकसित होणारे चांदणी चौक, बाणेर, कोथरूड, खराडी आणि वाघोली हे उपनगर मेट्रोने पुण्याशी जोडले जातील. हा प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे