NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर डॉ गोऱ्हेनी केली विजया रहाटकरांशी चर्चा”

“महिला चळवळीच्या व्यापक मुद्द्यांवर डॉ गोऱ्हेनी केली विजया रहाटकरांशी चर्चा”

मुंबई - महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांची काल मुंबईत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याशी सदिच्छा भेट झाली.

या सदिच्छा भेटीदरम्यान महिला चळवळीशी निगडित विविध सामाजिक, प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली.

डॉ. गोऱ्हे यांनी विधानपरिषद उपसभापती या नात्याने महिला विकास विषयक बैठका व कार्यक्रम यांची माहिती दिली. महिलांच्या सबलीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा, सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणांमधील समन्वय, ग्रामीण व शहरी भागांतील महिलांच्या अडचणी, महिला सुरक्षितता, आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि नेतृत्व विकास या मुद्द्यांवर चर्चा केंद्रित होती.

डॉ. गोऱ्हे यांनी राज्यस्तरावर तसेच केंद्रस्तरावर महिलांसाठी कार्यरत यंत्रणांमध्ये सहकार्य आणि धोरणात्मक एकवाक्यता वाढवण्याची गरज व्यक्त केली. तर रहाटकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी भाजप कार्यसंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देत राष्ट्रीय महिला आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला.

या सदिच्छा भेटीच्या निमित्ताने महिला विषयक प्रश्नांवर विविध पक्षांतील व विचारप्रवाहांतील नेतृत्व एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करत असल्याचे सकारात्मक उदाहरण समाजासमोर आले. 


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट