Breaking News
पावसाळा सुरू झाला तरी धावताहेत 111 पाणी टँकर….
जालना -जालना जिल्ह्यात भरपावसाळ्यात 111 पाणी टँकर धावत आहेत. जिल्ह्यात आज घडीला 111 टँकरद्वारे 70 गावे आणि 14 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील जालना आणि बदनापूर तालुक्यात सर्वाधिक टँकर धावत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय. सध्या जालना तालुक्यात 38, तर बदनापूर तालुक्यात 40 पाणी टँकर सुरू आहेत.
जालना तालुक्यातील 20 गावे आणि 6 वाड्यांना, तर बदनापूर तालुक्यातील 23 गावे व 8 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यात सध्या 3 पाणी टँकर सुरू असून ज्या ठिकाणी आवश्यकता आहे, फक्त त्याच ठिकाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade