NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा बाय द बे’ उपक्रम उत्साहात साजरा

जागतिक योग दिनानिमित्त ‘योगा बाय द बे’ उपक्रम उत्साहात साजरा

मुंबई - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने टाईम्स ऑफ इंडिया, योगा इन्स्टिट्यूट, इंडियन कोस्ट गार्ड आणि शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांच्या पुढाकाराने ‘योगा बाय द बे’ या उपक्रमाचे मरीन ड्राईव्हवर आयोजन केले होते. यंदा या उपक्रमाचे अकरावे वर्ष असून यानिमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे या उपक्रमाला उपस्थित राहिले. यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वांसोबत योगाभ्यासही केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जागतिक योग दिन जगभर साजरा होऊ लागला असल्याचे सांगितले. आज योगाचे महत्त्व सगळ्यांना पटल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वजण योग दिन उत्साहात साजरा करत आहेत. पंतप्रधान मोदीही 3 लाख विद्यार्थ्यांसोबत विशाखापट्टणम येथे योग दिन साजरा करत आहेत. अनेक असाध्य रोगांना आपल्यापासून दूर ठेवण्याचे सामर्थ्य योगात आहे. मात्र त्यासाठी दररोज योगाभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या तरुणाईने इतर व्यसने करण्यापेक्षा योगाचे व्यसन धरायला हवे अशी अपेक्षा यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच या उपक्रमाच्या यशस्वी आयोजन केल्याबद्दल शिंदे यांनी शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी आणि इंडियन कोस्ट गार्डला शुभेच्छा दिल्या.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी, इंडियन कोस्ट गार्डचे अधिकारी आणि ख्यातनाम फिटनेस ट्रेनर मिकी मेहता योग शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट