Breaking News
मानवाधिकार आयोगाकडून आंध्रप्रदेश सरकारला नोटीस
नवी दिल्ली - आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका गावात एका महिलेच्या पतीने कर्ज फेडले नाही म्हणून सावकाराने तिला झाडाला बांधून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या वृत्तांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने शुक्रवारी आंध्र प्रदेश सरकार आणि राज्य पोलिस प्रमुखांना नोटीस बजावली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) एका निवेदनात असे निरीक्षण नोंदवले आहे की माध्यमांमधील वृत्तातील मजकूर, जर खरा असेल, तर तो मानवी हक्कांच्या उल्लंघनाचे गंभीर मुद्दे उपस्थित करतो.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) “१६ जून रोजी आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम मंडळातील नारायणपुरम गावात एका महिलेच्या पतीने कर्ज फेडले नाही तेव्हा सावकाराने तिला झाडाला बांधून सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याच्या माध्यमांच्या वृत्ताची स्वतःहून दखल घेतली आहे”, असे म्हटले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर