Breaking News
फ़ेरबंदर येथील रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे व माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच फेरबंदर येथे मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्या मार्गदर्शना खाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये विभागातील नागरिकांनी आणि मनसे च्या महाराष्ट्र सैनिक यांनी रक्तदान करून सहभाग घेतला. या शिबिरांमधून तब्बल 250 पेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिरात विभागातील महिलांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले. आम्ही दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. लोकांना रक्तदानाचे महत्त्व समजावे आणि त्यातून जनजागृती व्हावी या उद्देशाने आम्ही हे रक्तदान शिबीर आयोजित केले असल्याची माहिती मनसेचे भायखळा सचिव महेशदादा थोरात यांनी दिली. या शिबिराला यशस्वी करण्यासाठी विभाग अध्यक्ष जगदीश राऊत मनसे विद्यार्थी सेनेचे अमोल रोगे यांचे अनमोल सकार्य लाबले विभागातील अनेक मान्यवर मंडळींनी तसेच विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant