Breaking News
डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांचे कार्य उल्लेखनीय
मुंबई - 7 जून रोजी राष्ट्रीय मिल मजूर संघ, परळ येथे आयोजित करण्यात आलेल्या हेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली. या कार्यक्रमात खा. अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या नावातच जगन्नाथ आहे. अनाथांचा नात आणि जगन्नाथ काम करत असतो त्याच पद्धतीने डॉक्टर हेगडे देखील समाजात कार्य करत आहेत. डॉक्टर हेगडे यांच्या लायन्स क्लब मध्ये फार मोठे कार्य असून त्यांनी आतापर्यंत विविध पुरस्कार भूषवले आहेत. आज 82 वर्षात देखील ते पदार्पण करत असून ते नक्कीच स्थिर तरुण आहेत आणि यापुढे देखील समाजात कार्य करत राहतील अशी मला आशा असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी या सोहळ्यात दिली. डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आमदार कालिदास कोळंबकर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र वाबळे, सुकृत खांडेकर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, श्रद्धा जाधव, अनिल कोकिळ विविध स्तरातील अनेक मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले गेल्या 35 वर्षांपासून माझी वेगळे यांच्याशी मैत्री आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी आवर्जून उपस्थित असतो. डॉक्टर हेगडे यांनी नगरपाल म्हणून केल्याने काम कायम स्मरणात राहील. आज ते 82 वर्षाची झाली तरी पण ते कुठेही थांबली नाही त्यांनी समाजकार्य अभिलेखपणे सुरू ठेवले असून त्यांच्या समाज कार्याला आज पन्नास वर्षे पूर्ण झालेली आहे ही फार गौरवाची बाब आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे