NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

सर्व AI ड्रीम लायनर बोईंग विमानांच्या तपासणीचा DGCA चा निर्णय

सर्व AI ड्रीम लायनर बोईंग विमानांच्या तपासणीचा DGCA चा निर्णय

नवी दिल्ली - काल अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या AI-171 फ्लाइटचा भीषण अपघात झाला, ज्यात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर DGCA ने तत्काळ प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एअर इंडियाच्या सर्व बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. १५ जून २०२५ पासून सर्व तपासण्या सुरू होतील. DGCA च्या प्रादेशिक कार्यालयांच्या समन्वयाने ही प्रक्रिया पार पडेल. तपासणी अहवाल DGCA कडे सादर करणे बंधनकारक असेल. मागील १५ दिवसांत आलेल्या तांत्रिक बिघाडांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक. अपघातग्रस्त विमानात GE Aerospace च्या GEnx इंजिन्सचा वापर करण्यात आला होता. GE Aerospace नेही तपासात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे

DGCA ने एअर इंडियाच्या Boeing 787-8 आणि 787-9 विमानांवर खालील तपासण्या करण्याचे आदेश दिले आहेत:

इंधन प्रणाली आणि संबंधित सेन्सर्सची तपासणी

कॅबिन एअर कंप्रेसर आणि त्यासंबंधित यंत्रणांची तपासणी

इलेक्ट्रॉनिक इंजिन कंट्रोल सिस्टीम चाचणी

इंजिन फ्युएल ड्रिव्हन अ‍ॅक्च्युएटर आणि ऑइल सिस्टीम तपासणी

हायड्रॉलिक सिस्टीमची कार्यक्षमता तपासणे

टेकऑफ पॅरामिटर्सचे पुनरावलोकन

‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ आता प्रत्येक ट्रांझिट तपासणीमध्ये अनिवार्य

पॉवर अ‍ॅश्युरन्स चेक्स दोन आठवड्यांत पूर्ण करणे आवश्यक

ही कारवाई केवळ एअर इंडियासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.

DGCA म्हणजेच नागरी उड्डाण महासंचालनालय (Directorate General of Civil Aviation) हे भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेले एक महत्त्वाचे नियामक संस्थान आहे. याचे मुख्य कार्य म्हणजे भारतातील नागरी विमान वाहतुकीचे सुरक्षित, नियमनबद्ध आणि कार्यक्षम संचालन सुनिश्चित करणे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट