NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे?

पालिका निवडणुकीचा मुहूर्त आणखी पुढे? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट

आता वर्षअखेरीस वाहणार निवडणुकीचे वारे?  

Mumbai BMC Elections 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून दर दिवशी नवी माहिती समोर येत असली तरीही निवडणूक नेमकी कधी पार पडणार याची मात्र अद्यापही स्पष्टोक्ती झालेली नाही. दरम्यान राज्यातील महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने नुकताच जाहीर केला. या कार्यक्रमानुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आता महापालिका आणि नगरपालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता तुलनेनं कमी असून, त्या थेट नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

9 टप्प्यांमध्ये प्रभाग रचना

प्रभाग रचनेच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण 9 टप्प्यांचं वेळापत्रक तयार करण्यात आलं आहे. राज्य निवडणूक आयोगानुसार मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान जाहीर होणार आहे. याच कालावधीत अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचनाही प्रसिद्ध केली जाणार आहे. ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना देखील राज्य निवडणूक आयुक्तांकडून 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाणार आहे.

प्रभाग रचनांवरून स्पष्ट होतंय की...

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतरचे टप्पे म्हणजे प्रथम, प्रभागांचे आरक्षण आणि त्यानंतर प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या दोन्ही टप्प्यांसाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. परिणामी ही सर्व प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होऊन, त्यानंतरच निवडणुकीचं अंतिम वेळापत्रक घोषित होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर नव्हे, तर थेट नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये या बहुप्रतिक्षित निवडणुका होऊ शकतात. तेव्हा हा मुहूर्त तरी अंतिम राहतो की, त्यातही काही बदल होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


रिपोर्टर

संबंधित पोस्ट