Breaking News
Tata Group कडून अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १ कोटींची मदत जाहीर
अहमजाबाद येथे झालेल्या AIR India च्या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना Tata समुहाने मदतीचा हात दिला आहे. Air India चे मालक असलेल्या टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितले की, प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ₹१ कोटींची आर्थिक मदत दिली जाईल, तसेच जखमींच्या वैद्यकीय खर्चाची जबाबदारीही टाटा समूह घेईल. BJ मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाचे पुनर्बांधणीसाठीही मदत जाहीर केली आहे.
Air India चे CEO कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “हा दिवस आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक आहे.”
अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी सांगितले की, “हवामान आणि परिस्थिती लक्षात घेता काही जिवंत बचावले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला यांनी “या भीषण घटनेमुळे आम्ही अत्यंत हादरलेलो आहोत” असे म्हटले आहे.
Boeing कंपनीने Air India शी संपर्कात असल्याचे जाहीर केले आणि तांत्रिक तपासात सहकार्याचे आश्वासन दिले आहे.
“आम्ही एअर इंडिया फ्लाइट 171 संदर्भातील या दुर्दैवी घटनेमुळे अत्यंत दुःखी आहोत. या क्षणी आमची भावना शब्दांत व्यक्त करणं अशक्य नाही. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत आणि जे जखमी झाले आहेत, त्यांच्याशी आमच्या प्रार्थना आणि सहवेदना आहेत. या दु:खद घटनेत ज्यांनी प्राण गमावले आहे, त्यांच्या कुटुंबियांना टाटा समूहाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत दिली जाईल. तसेच, जखमींच्या वैद्यकीय खर्चाची पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ आणि त्यांना आवश्यक ती सर्व काळजी आणि सहाय्य प्रदान केले जाईल. याशिवाय, बी. जे. मेडिकलच्या वसतिगृहाच्या उभारणीत देखील आम्ही मदत करू. या अत्यंत कठीण प्रसंगी आम्ही प्रभावित कुटुंबे आणि समुदायांसोबत ठामपणे उभे आहोत”, असं टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे