NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या काँग्रेसचे राज्यभर मशाल

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे.विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील आंदोलनात पक्षाचे नेते सहभागी होतील.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड मोठे यश मिळावे व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे.

मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे.

लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील मॅच फिक्सिंगची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट