NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

मुंबई – जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी काल वर्तमानपत्रातून उपस्थित केलेले महाराष्ट्र निवडणुकीबाबतचे सर्व आरोप

पुराव्यांसह खोडून काढले आहेत. ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख आले आहेत.

ची सुरुवात करताना गडचिरोली दौर्‍यापासून केली आहे. बंदूक घेतलेला नक्षलवादी संपविणे सोपे, पण अर्बन नक्षली मानसिकता संपवायला वेळ लागेल असे म्हणत, भारत जोडोच्या नावाखाली चालविलेल्या भारत तोडो अभियानात डॉ. मनमोहन सिंग यांनी ठरविलेल्या किती नक्षली संघटना होत्या, याचे करुन स्मरण करून दिले आहे.

फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत 19 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या भाषणाचे स्मरण करुन दिले आहे . एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्ला फडणवीस यांनी राहुल गांधींना दिला आहे. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

फडणवीसांनी दिलेल्या उत्तरात

मुद्दा पहिला : 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोला लगावला आहे.

दुसरा मुद्दा : मतदारवाढीचा!

विधानसभा निवडणुकीत 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे.

जुनी आकडेवारी दिली.

2014 ते 2019 या काळात : 63 लाख नवीन मतदार

2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार

2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार

म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजीबात नाही.

लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा दिली

2004 : लोकसभेपेक्षा विधानसभेत 5 टक्के अधिक.

2009 मध्ये 4 टक्के अधिक,

2014 मध्ये 3 टक्के अधिक,

2019 मध्ये 1 टक्का अधिक,

2024 मध्ये 4 टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडले असे नाही.

तिसरा मुद्दा : अधिक मतदानाचा !

दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतके मतदान झाले.

त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83 टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत?याचा विचार गांधींनी केला पाहिजे.

सायं. 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही काय?

फडणवीसांच्या कार्यालयाने ‘लोकसत्ता’ मध्येच 3 डिसेंबर 2024 रोजी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला आहे.

2024 च्या लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्यात सायं. 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी, जी दुसर्‍या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का?


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट