Breaking News
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुपतर्फे लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन व आरएमएमएस सहकार्याने झालेल्या ७/१०/१३ वर्षाखालील डॉ. जगन्नाथराव हेगडे वाढदिवस चषक बुध्दिबळ स्पर्धेत अरेना कॅन्डीडेट मास्टर लोबो फरडीन, नोवा जुयल, अधवान ओसवाल यांनी पाचही सामने जिंकून निर्विवाद गटविजेतेपद पटकाविले. पाचव्या निर्णायक सामन्यात समान ४ गुण नोंदविणाऱ्या लोबो फरडीनने अर्णव नवघणेच्या (४ गुण) राजाला २७ व्या मिनिटाला कोंडीत पकडले आणि सलग पाचव्या विजयासह प्रथम क्रमांकावर झेप घेतली. माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगेडे, क्रीडाप्रेमी अण्णा शिर्सेकर, विजय रायमाने, जितेंद्र सकपाळ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
मुंबई शहर जिल्हा बुध्दिबळ संघटना मान्यतेने परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहामध्ये झालेल्या १३ वर्षाखालील गटात लोबो फरडीनने (५ गुण) प्रथम, अर्णव नवघणेने (४ गुण) द्वितीय, अर्णव पोर्लेकरने (४ गुण) तृतीय, निव बाफनाने (४ गुण) चौथा, निशांत पन्हाळकरने (३.५ गुण) पाचवा; १० वर्षाखालील गटात नोवा जुयलने (५ गुण) प्रथम, अर्णव धामापूरकरने (४ गुण) द्वितीय, विस्मित सावंतने (४ गुण) तृतीय, ईशी सिंगने (४ गुण) चौथा, लोबो देत्यनने (३.५ गुण) पाचवा तर ७ वर्षाखालील गटात अधवान ओसवालने (५ गुण) प्रथम, नीर जुयलने (३.५ गुण) द्वितीय, अव्यान उपाध्यायने (३.५ गुण) तृतीय, निर्वाण दर्यानानीने (३ गुण) चौथा, शनय शाहने (३ गुण) पाचवा पुरस्कार मिळविला.
********************************************
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant