Breaking News
तब्बल 41 वर्षांनी या दिवशी अंतराळात जाणार भारतीय अंतराळवीर
भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मिशन पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आले आहे. आता त्यांचे यान 10 जून रोजी संध्याकाळी 5:52 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाण्यासाठी उड्डाण घेईल. ते स्पेसएक्स क्रू ड्रॅगनमधून अंतराळात प्रवास करतील. यापूर्वी हे प्रक्षेपण 29 मे आणि 8 जून रोजी नियोजित होते, परंतु ऑपरेशनल ॲडजस्टमेंट्स आणि सुरू असलेल्या क्वारंटाईन प्रोटोकॉलमुळे ते पुढे ढकलण्यात आले.
राकेश शर्मा यांनी 1984 मध्ये रशियन सोयुझ यानातून अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर होण्याचा मान मिळवला होता. त्यांच्या ऐतिहासिक प्रवासानंतर तब्बल 41 वर्षांनी शुभांशु शुक्ला ISS वर जाणार आहेत. Ax-4 मिशनचे नेतृत्व नासाच्या माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन करत आहेत. त्या अनुभवी अंतराळवीर असून दोनदा ISS च्या कमांडर राहिल्या आहेत. Ax-4 क्रूमध्ये पोलंडचे स्लाव्होझ उझनान्स्की-विस्निव्हस्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचाही समावेश आहे, जे शुक्ला यांच्यासारखेच आपल्या देशाचे ISS साठी पहिले अंतराळवीर बनणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर