Breaking News
धक्कादायक! सालगड्याच्या मेहुणीवर शेतात अत्याचार, पीडित तरुणी 6 महिन्यांची गर्भवती
औसा, लातूर: तालुक्यातील एका शेतात सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारात पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघड झाले आहे.
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून आरोपी सतत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत होता आणि याबाबत कोणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
अल्पवयीन मेहुणीवर ठेवली वाईट नजर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या बहिणीकडे राहण्यासाठी आली होती. तिचा मेहुणा आरोपीच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता. याच दरम्यान, आरोपीने सालगड्याच्या अल्पवयीन मेहुणीवर वाईट नजर ठेवली आणि वारंवार शेतातील शेडकडे येऊन तिचा विनयभंग केला.
जबरदस्तीने केले लैंगिक अत्याचार
आरोपीने पीडित मुलीला 'आपण नवरा-बायकोप्रमाणे राहू' असे सांगून तिच्यावर सतत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत बहिणीला किंवा मेहुण्याला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सहा महिन्यांनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.
ॲट्रॉसिटी अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याची बाब डॉक्टरांनी पोलिसांना सांगितली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड विधान आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पीडितेचा सविस्तर जबाब नोंदवला असून, तिने घडल्या प्रकाराचे कथन पोलिसांसमोर केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास औशाचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी हे करत आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर