Breaking News
EPS 95 पेन्शनधारकांसाठी खूशखबर! 7500 रुपये देण्याबाबत मोदी सरकार लवकरच घेणार मोठा निर्णय
EPS 95 Pension Hike: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारने नुकताच 8 वा वेतन आयोग संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील फायदा होईल, अशा EPS 95 किमान पेन्शनविषयीही सरकार लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे.
EPS 95 वर सरकारचा फोकस
मोदी सरकारने लवकरच 8 वा वेतन आयोग स्थापन करण्याचे संकेत दिले आहे. त्यासाठी अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे. या आयोगामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारले जाणार आहे. पण त्याचबरोबर खासगी क्षेत्रात कार्यरत असलेल्या EPS 95 पेन्शनधारकांनाही न्याय मिळावा, म्हणून केंद्र सरकार महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
पेन्शनधारकांची दीर्घकालीन मागणी
EPS 95 अंतर्गत सध्या फक्त 1000 रुपये किमान पेन्शन मिळते, जी आजच्या महागाईच्या काळात अत्यंत कमी आहे. त्यामुळे पेन्शनधारक गेल्या अनेक वर्षांपासून किमान पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी करत आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकारकडे निवेदनं दिली असून विविध स्तरांवर आंदोलनंही केली आहेत.
संसदीय समितीची शिफारस
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खासदार बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समिती स्थापन केली आहे. या समितीने EPS 95 अंतर्गत मिळणारी किमान पेन्शन वाढवावी, अशी स्पष्ट शिफारस केली आहे.
याआधी 3000 रुपयांची चर्चा
पूर्वी सरकारकडून किमान पेन्शन 3000 रुपये करण्याच्या चर्चा होत्या. मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नव्हती. त्यामुळे पेन्शनधारक नाराज होते. आता मात्र 7500 रुपये किमान पेन्शनबाबत मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला आहे.
लवकरच सकारात्मक निर्णयाची शक्यता
पेंशनधारकांचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर, EPS 95 पेन्शनधारकांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, EPS 95 पेन्शनधारकांसाठी किमान पेन्शन 7500 रुपय करण्याबाबत सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वरील माहिती ही वृत्तमाध्यमांतून समोर आलेल्या बातम्यांवर आधारित आहे.गुंतवणूक किंवा पेन्शन संदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना व सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर