Breaking News
लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे कधी जमा होणार? मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Aditi Tatkare on Ladki Bahin Yojana May month installment when will get beloved sisters: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत असतात. थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत असतात. मात्र, जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना न मिळाल्याने विविध चर्चा सुरू झाल्या. याच दरम्यान आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करायचे आहे की, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या सुरू राहणार आहे. साधारणे तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही छाननी सुरू केली. दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. खरंतर जानेवारी महिन्यात झालेल्या या छाननीत हे लक्षात आलं होतं आणि त्यानंतर या शासकीय कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांचा लाभ तात्काळ थांबवण्यात आला होता.
लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात येईल. ज्या प्रकारे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला होता तशाच प्रकारे मे महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र?
मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात नेमका कधी जमा होणार याकडे सर्व बहिणींच्या नजरा लागल्या आहेत. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, लाडक्या बहिणींना मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
योजनेचा 11 वा आणि 12वा हप्ता
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बाँक खात्यात थेट डीबीटी मार्फत पैसे जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे