भयंकर! पत्नीची हत्या केल्यावर पतीने हार्ट अटॅकचा देखावा केला पण...,
भयंकर! पत्नीची हत्या केल्यावर पतीने हार्ट अटॅकचा देखावा केला पण..., नागपुरात नेमकं काय घडलं? पाहा
Maharashtra Crime News: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातू पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर हे प्रकरण दडपण्यासाठी आरोपीने चक्क पत्नीला हृदयविकाराचा झटका आल्याचा देखावा निर्माण केला. तसे सर्व नातेवाईक आणि शेजाऱ्यांनाही सांगितले. पण महिलेच्या आईला एक संशय आला आणि आरोपीचा खरा चेहरा सर्वांसमोर उघड झाला.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक महिलेचे नाव शीतल जॉन्सन मांडपे असे आहे. तर आरोपीचे नाव जॉन्सन प्रल्हाद मांडपे असे आहे. शीतल आणि जॉन्सन हे पती-पत्नी होते. गेल्या अनेक दिवसांपासून या पती-पत्नीत वारंवार मतभेद आणि वाद होत होते. याच वादांमुळे दोघेही एकमेकांपासून वेगवेगळे राहत होते. या दाम्पत्याला दोन मुले सुद्धा आहेत.
आरोपी जॉन्सन याने 21 मे रोजी पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने पत्नी शीतलचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कळल्याचं सांगत तिचे घर गाठले. तसे त्याने शेजाऱ्यांनाही सांगितले. पण शीतलच्या आईला आरोपीवर संशय आला. तसेच मृतक शीतलच्या शरीरावर जखमा आणि व्रण दिसून आले. यामुळे शीतलची आई गौतमी चव्हाण यांचा संशय आणखी बळावला.
यानंतर शीतलचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी एम्स रुग्णालयात पाठवला. या घटनेची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. जेव्हा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला तेव्हा आरोपी जॉन्सन याचे बिंग फुटले. कारण, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये शीतलचा मृत्यू हा गळा आवळल्याने झाल्याचं समोर आलं. आपण पकडले जाणार हे लक्षात येताच आरोपीने पळ काढला.
सध्या आरोपी जॉन्सन हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपुरात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
ADHARSH SWARAJ 21 AUG TO...
- 27 August, 2025
ADHARSH SWARAJ 14 AUG TO...
- 20 August, 2025
ADHARSH SWARAJ 7 AUG TO...
- 13 August, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर