Breaking News
मुसळधार पावसामुळे भीमाशंकर परिसरात 25 गावांचा संपर्क तुटला
पुणे - गेल्या २ दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. अतिवृष्टीमुळे गावोगावचे नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर परिसरातील अनेक गावांच्या आसपासच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, डिंभे धरणाच्या आतमध्ये असणाऱ्या गावांकडे जाणारा रस्ता खचला आहे, त्यामुळे इकडच्या जवळपास 25 गावांचा संपर्कही तुटला आहे, मात्र पर्यायी रस्त्याने आताही वाहतूक वळविण्यात आली आहे, डिंभे धरणा जवळून जाणाऱ्या रस्त्याचे काम नुकतेच करण्यात आले होते, मात्र पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे, त्यामुळे या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर