Breaking News
अचूक हवामान अंदाज प्रणाली सुरू
देशात हवामानाचा अंदाज अधिक अचूकपणे वर्तवण्यासाठी सरकारने एक नवीन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीचे नाव ‘भारत फोरकास्टिंग सिस्टीम’ (Bharat Forecasting System) आहे. ही जगातील सर्वात आधुनिक प्रणाली आहे. या प्रणालीमुळे स्थानिक पातळीवरील हवामानाचा अंदाजही अचूकपणे वर्तवता येणार आहे. शास्त्रज्ञ पार्थसारथी मुखोपाध्याय यांच्यासह अनेक संशोधकांनी ही प्रणाली विकसित केली आहे. यासाठी ‘अर्का’ नावाचे नवीन सुपरकॉम्प्युटर IITM कॅम्पसमध्ये बसवण्यात आले आहे.
पूर्वी ‘प्रत्युष’ सुपरकॉम्प्युटरला हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी १० तास लागायचे. ‘अर्का’मुळे तेच काम आता ४ तासांत होते.”
या सिस्टीम’मुळे हवामानाचा अंदाज अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होणार आहे. या प्रणालीमध्ये ६ किलोमीटरच्या क्षेत्रात हवामानाचा अंदाज वर्तवला जाईल. यापूर्वी १२ किलोमीटरच्या क्षेत्रासाठी अंदाज वर्तवला जात होता. नवीन प्रणालीमुळे शेती, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षितता यांसारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade