Breaking News
रामदास आठवले यांनी घेतली दिवंगत वैष्णवी कुटुंबीयांची भेट
मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत वैष्णवी यांच्या माहेरकडील कुटुंबीयांची कस्पटे वस्ती येथे सांत्वनपर भेट घेतली. वैष्णवी यांची आत्महत्या ही आत्महत्या बसून तिच्या सासरच्या लोकांनी केलेली हत्या आहे.त्यामुळे वैष्णवी ला न्याय देण्यासाठी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.यावेळी दिवंगत वैष्णवी यांचे माता पिता दोन्ही भाऊ आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते .
यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, परशुराम वाडेकर, बाळू भागवत, कुणाल व्हावलकर, शैलेश चव्हाण, अजीज शेख , प्रवीण ओव्हाळ उमेश कांबळे, आदी उपस्थित होते. डीसीपी विशाल गायकवाड उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर