NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

मान्सून महाराष्ट्रात दाखल, IMD ची अधिकृत घोषणा

मान्सून महाराष्ट्रात दाखल, IMD ची अधिकृत घोषणा 

मुंबई - गेल्या आठवडाभरापासून राज्यात विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मे महिन्याच्या उन्हाळ्याच्या झळा त्यामुळे कमी झाल्या असल्या तरीही हा पूर्वमोसमी पाऊस आहे की मान्सून अशी शंका शेतकरी वर्गामध्ये होती. पूर्वमोसमी पावसानंतर मान्सूनचे आगमन लांबणार का? असा प्रश्न उपस्थित होत असताना आज IMD ने आजपासून महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा तब्बल 12 दिवस आधी राज्यात पोहोचला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचे वातावरण आहे. दरवर्षी साधारणतः 7 जूनच्या सुमारास महाराष्ट्रात मान्सून दाखल होत असतो. शनिवारी केरळात पोहोचलेल्या मान्सूनला, महाराष्ट्रात आगमनासाठी एक ते दोन दिवस लागतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र मात्र यंदा हवामानातील पोषक स्थितीमुळे अवघ्या काही तासांतच मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला.

यंदाच्या वर्षी राज्यात आणि देशभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सून 107 टक्क्यांपर्यंत पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राज्यातही समाधानकारक आणि भरघोस पावसाची शक्यता असल्याने कृषी क्षेत्राला मोठा दिलासा मिळू शकतो. 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यानचा पाऊस मान्सूनचा म्हणून नोंदवला जातो.

केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो. नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो आणि आगेकूच करत ८ जुलै रोजी संपूर्ण देश व्यापतो, तर १७ सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य हिंदुस्थानातून माघारीचा प्रवास सुरू करतो आणि १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे माघार घेतो, पण दरवर्षी १ जून या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला आहे. याआधी २००९ आणि २००१ मध्ये मान्सून २३ मे रोजीच दाखल झाला होता. गेल्या वर्षी २०२४मध्ये मान्सून ३० मे रोजी केरळमध्ये धडकला होता. १९१८ मध्ये सर्वात लवकर म्हणजेच ११ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट