Breaking News
जागतीक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी, जपानला टाकले मागे
भारत आता जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी काल याबाबत माहिती दिली. IMF च्या आकडेवारीनुसार भारताचा GDP आता 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. आता फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही यावेळी नीती आयोगाचे सीईओ आर. सुब्रह्मण्यम म्हणाले.
नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीनंतर आर. सुब्रह्मण्यम यांनी पत्रकारांशी संवाद साधत अत्यंत महत्वाच्या विषयावर भाष्य केले. ‘सध्या जागतिक राजकीय आणि आर्थिक वातावरण भारताच्या बाजूने आहे. सध्या, मी बोलत असताना भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलाय’, असे त्यांनी सांगितले. आज भारताची अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाल्याचे आयएमएफने म्हटलं आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade