Breaking News
NDA च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी होणार पास आउट
पुणे - राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) इतिहासात पहिल्यांदाच महिला कॅडेट्सची तुकडी प्रशिक्षण पूर्ण करून पास आउट होणार आहे. ३० मे रोजी १४८ व्या अभ्यासक्रमाची पासिंग आउट परेड (पीओपी) पार पडणार असून, यामध्ये १७ महिला कॅडेट्स ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्ससह पदवीधर होणार आहेत.
या महिला कॅडेट्सपैकी सर्वाधिक ३५ हरियाणामधून, २८ उत्तर प्रदेशमधून, १३ राजस्थानमधून आणि ११ महाराष्ट्रातून आहेत. दक्षिण भारतातून कर्नाटकातील एक व केरळमधील चार कॅडेट्स NDAमध्ये सामील झाल्या आहेत.
२०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. त्यानंतर UPSC मार्फत २०२२ मध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी एनडीएमध्ये प्रवेश खुला करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाच्या तीन वर्षांनंतर आता या महिलांनी आपले कठोर प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्या भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात अधिकारी म्हणून सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade